सात्रळ, सोनगाव, धानोरे, रामपूरला ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले

सात्रळ, सोनगाव, धानोरे, रामपूरला ऊस तोडणीचे नियोजन कोलमडले

सात्रळ |वार्ताहर| Satral

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) सात्रळ (Satral), सोनगाव (Songav), धानोरे (Dhanore), रामपूर (Rampur) येथील शेतकर्‍यांच्या ऊस तोडणीचे नियोजन (Sugarcane Harvesting Planning) कोलमडल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे आता ऊस तोडणीपायी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांनी (Farmer) ऊस शेतीला रामराम ठोकून अन्य पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. आता संतापलेल्या शेतकर्‍यांनी वाळलेल्या उसावरून व खोडव्यावरून नांगर फिरविला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान (Farmer Financial Loss) झाले आहे.

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) सात्रळ, सोनगाव, धानोरे, रामपूर हा प्रवराकाठचा पाणीपट्टा व बागायती शेतीचा पट्टा ओळखला जातो. या परिसरातील शेतकरी कायमच ऊस पीक घेण्यासाठी पुढे होता. परंतु ऊस तोडीचे नियोजन कोलमडल्यामुळे ऊस पीक पंधरा महिन्याचे झाले असून ऊस तोड मिळत नाही. पर्यायी उसाच्या टनेजमध्ये कमालीची घट होणार असल्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. अक्षरशः येथील शेतकर्‍यांनी सुरूचे पीक काढून ऊस खोडवा नांगरून काढला आहे.

उसाची शेती तोट्यात जात असल्याने येथील शेतकरी ऊस पिकाऐवजी कपाशी व इतर पीक घेण्याकडे वळला आहे. हा परिसर उसाचा मळा म्हणून ओळखला जात होता. परंतु भविष्यात हा परिसर ऊसमुक्त परिसर म्हणून ओळखला जातो की काय? अशी शंका शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com