राहुरी : 10 सरपंचांसाठी 29 तर सदस्यांच्या 115 जागांसाठी 225 उमेदवार रिंगणात

20 सदस्य व ब्राम्हणगावभांडचे सरपंच बिनविरोध
राहुरी : 10 सरपंचांसाठी 29 तर सदस्यांच्या 115 जागांसाठी 225 उमेदवार रिंगणात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत छाननीच्या दिवशी सदस्यपदासाठी वैध ठरलेल्या 484 उमेद्वारी अर्जापैकी 159 उमेद्वारी अर्ज माघारी घेतल्याने तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या एकूण 115 सदस्यपदापैकी 20 सदस्यपदाच्या जागा बिनविरोध झाल्याने 95 जागांसाठी 225 उमेद्वार निवडणूक रिंगणात आहे.

तसेच सरपंच पदासाठी वैध असलेल्या 86 अर्जांपैकी 56 उमेद्वारी अर्ज माघारी घेतल्याने व 1 बिनविरोध झाल्याने 29 उमेद्वार सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात आहे.

कोल्हार खुर्द येथे सरपंच पदासाठी 5 तर 14 सदस्यपदासाठी 33 तर एक जागा बिनविरोध, खडांबे खुर्द येथे सरपंच पदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 27, मांजरी सरपंच पदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 22, ब्राम्हणगाव भांड येथील सरपंचपदाची जागा बिनविरोध तर सदस्यपदाच्या 7 जागांपैकी 5 जागा बिनविरोध तर 2 जागांसाठी 4, कोंढवड येथे सरपंच पदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 9 जागांसाठी 22, सोनगाव येथे सरपंच पदासाठी 2 तर सदस्यपदाच्या 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध तर 9 जागांसाठी 18, आरडगाव येथे सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 11 जागाांसाठी 29, तुळापूर येथे सरपंचपदासाठी 2 तर सदस्यपदाच्या 7 जागांपैकी 1 जागा बिनविरोध तर 6 जागांसाठी 13, मानोरी येथे सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 13 जागांसाठी 38, केंदळ खुर्द सरपंचपदासाठी 2 तर सदस्यपदाच्या सर्व 9 जागा बिनविरोध, ताहाराबाद येथे सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदाच्या 11 जागांपैकी 2 बिनविरोध तर 9 जागांसाठी 19 असे उमेद्वार निवडणूक रिंगणात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com