राहुरी तालुक्यातील पुर्व भागात पांढर्‍या सोन्यावर चोरांचा डल्ला

राहुरी तालुक्यातील पुर्व भागात पांढर्‍या सोन्यावर चोरांचा डल्ला

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) पुर्व भागातील शेतकर्‍यांच्या पांढरं सोन्यावर भुरट्या चोराच्या (Cotton Theft) नजरा असून एकीकडे खरीप हंगामात (Kharif Season) पिकांचे अतिवृष्टीमुळे तसेच परतीच्या पावसामुळे (Rain) शेतकर्‍यांचे मोठे नुकसान (Farmer Loss) झाले असल्याने बळीराज्या दुहेरी संकटात सापडला आहे. कापूस चोरीचे (Cotton Theft) प्रमाण वाढल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांच्या तोंडातील घास हिसकावण्याचे काम सध्या परिसरातील भुरटे चोर (Theft) करीत असल्याने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

राहुरी तालुक्याच्या (Rahuri Taluka) पुर्वभागात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांचा (Theft) सुळसुळाट वाढला आहे. यंदा कापसाचे (Cotton) क्षेत्र मोठ्याप्रमाणात असल्याने आरडगांव (Aradgav) येथील मोहन खुरुद, ज्ञानेश्वर खुरुद, बाळासाहेब म्हसे, आदिनाथ ढेरे, तसेच मानोरी येथील कचरु आढाव या शेतकर्‍यांच्या कापसावर भुरट्या (Cotton Theft) चोरट्यांनी डल्ला मारल्याने या पुर्वीही रात्रीच्या वेळी शेळ्या, बोकडे, कोंबड्या, विद्युत मोटारी, केबली, मोटर सायकली यासारख्या चोर्‍या गावात होत होत्या. मात्र, आता शेतकर्‍यांच्या शेतातीलच माल चोरी होत असल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्या थंडीत आपल्या शेताचे राखण करण्याची वेळ आली आहे.

या चोरांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने शेतकरी याबाबत तक्रार करण्यास धजावत नाहीत. या भुरट्या कापूस चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी व शेतकरी वर्गामधून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com