राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात काल सोमवारी करोनाची लाट पहायला मिळाली.

काल दिवसभरात 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. त्यात 22 महिलांचा समावेश आहे. गेल्या महिनाभरापासून तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यास आरोग्य व महसूल प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, तालुक्यात करोनाचे लसीकरण सुरू असून नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. काल राहुरी शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. शहरात 20 जणांना करोनाची बाधा झाली. त्यात 11 पुरुष असून ते 31, 27, 38,58,41, 18, 25, 25, 51, 49, 21 वर्ष वयोगटातील असून 9 महिलांनाही करोनाची बाधा झाली आहे. त्या 80, 8,23, 46, 22, 58, 45, 17, व 1वर्ष अशा वयोगटातील आहेत.

वांबोरीतही करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वांबोरीत 15 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात 10 पुरुष 52,52,29, 33, 62, 32, 34, 41, 51, 50 वर्ष वयोगटातील तर 5 महिला 54, 36, 30, 46, 26 वर्ष वयोगटातील आहेत.

खडांबे खुर्द येथे 2 पुरुष 62, 40 वर्ष वयोगटातील तर 2 महिला 52, 60 वर्ष वयोगटातील अशा चारजणांना करोनाची बाधा झाली आहे.

देवळाली प्रवरा येथेही 2 पुरुष 52, 33 वर्ष वयोगटातील असून त्यांनाही बाधा झाली आहे. राहुरी फॅक्टरी येथे 1 पुरुष, 55 व 1 महिला 29 वर्षे अशा दोनजणांना करोनाची बाधा झाली आहे. सोनगांव 40 वर्ष पुरुष, 62 वर्ष महिला, तांदुळवाडी येथे 29 वर्ष पुरुष, 50 वर्ष महिला अशा दोनजणांना करोनाची बाधा झाली आहे.

उंबरे येथे 70 वर्षीय महिलेला, बारागांव नांदूर येथे 41 वर्ष पुरुष, टाकळीमियात 62 वर्ष पुरुष, धानोरे 39 वर्ष पुरुष, राहुरी विद्यापीठ 41 वर्ष पुरुष, वळण 45 वर्ष पुरुष, वांजुळपोई 33 वर्ष महिला, कात्रड 18 वर्षाच्या मुलीला करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.