दोन दिवसांत राहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

दोन दिवसांत राहुरी तालुक्यातून 
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गेल्या दोन दिवसांत राहुरी तालुक्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पहिल्या घटनेत राहुरी शहर हद्दीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तर दुसर्‍या घटनेत तांभेरे परिसरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले.

राहुरी शहर हद्दीतील एक 17 वर्षे 10 महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह राहत आहे. दि. 23 एप्रिल रोजी दुपारी एक वाजे दरम्यान त्या मुलीला तिच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेले. मुलीच्या आईने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खरात करीत आहेत.

दुसरी घटना ही राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे घडली. त्या ठिकाणी एक 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंंबासह राहत आहे. दि. 24 एप्रिल रोजी दुपारी एक ते तीन वाजे दरम्यान ती मुलगी तिच्या राहत्या घरातून बेपत्ता झाली. तिच्या नातेवाईकांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्या मुलीच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलिस किरीत आहेत. या दोन्ही घटनांमुळे तालुक्यात पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.