विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी, मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

विवाहितेची चिमुकलीसह विहिरीत उडी, मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

टाकळीमिया | वार्ताहर

विवाहितेने चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना टाकळीमियात (Takalimiya) उघडकीस आली आहे. मायलेकीच्या आत्महत्येने (mother daughter commits suicide) खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विद्या दिलीप कडु (वय 25) व सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीचे नाव असून याबाबत मिळालेली माहीती अशी की, टाकळीमिया (Takalimiya) येथील बापूसाहेब शिंदे (रिक्षा चालक) यांची मुलगी विद्या हिचा विवाह देवळाली प्रवरा (Deolali pravara) येथील दिलीप कडु यांच्याशी 5 वर्षापूर्वी झाला होता. त्यांना सिद्धी ही 4 वर्षाची मुलगी होती. सदर विद्या हि शाळेत असल्यापासून थोडीशी मनोरुग्ण (Psychiatric) होती. तिला तेव्हापासून औषधोपचार चालु होते. तिची श्रीरामपूर (Shrirampur) येथील दवाखान्यात मासिक ट्रिटमेंट चालु होती. या आजारामुळे ती सुमारे तिन वर्षा पासुन टाकळीमिया येथे माहेरी राहात होती.

बुधवार दि 1 तारखेला तिला श्रीरामपूर येथे दवाखान्यात नेण्याचे ठरले होते. तिचे वडील हे रिक्षाला डिझेल टाकण्यासाठी गावात गेले होते व तिची आई त्यांच्यासाठी डबा बनवत होती. मात्र विद्या ही या औषधोपचार व इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी टाकली. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू झाला सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. मात्र तिचा शोध लागला नाही. त्यामुळे बुधवारी रात्री देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली. तरीही सर्वत्र शोध सुरू होता.

काल (गुरूवार) सायंकाळी विहीरीत चिमुकल्या सिध्दीचा मृतदेह तरंगताना आढळून आला परंतु तिची आई विद्या ही वर आली नसल्याने विहिरीतील पाणी उपसण्यासाठी ट्रॅक्टरचे पंप मागवण्यात आले. त्याच प्रमाणे गळ टाकण्यात आले. सुमारे तिन तासांच्या प्रयत्नानंतर गळाला तिचा मृतदेह लागला. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशीरा पाठवण्यात आले.

पुढील तपास देवळाली पोलीस स्टेशनचे हेडकाॅन्सटेबल प्रभाकर शिरसाठ, पो.हेडकाॅस्टेबल नवनाथ भिताडे पोलीस. सागर माळी, वाघमारे, व टाकळीमियाचे पोलीस पाटील नामदेव जगधने हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com