राहुरी तहसीलच्या छताचा भाग कोसळला

नायब तहसीलदार बालंबाल बचावल्या
राहुरी तहसीलच्या छताचा भाग कोसळला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तहसील कार्यालयातील (Rahuri Tahsil Office) कामकाज सुरळीतपणे सुरू होते. यावेळी अचानक छताचा काही भाग कोसळला (Part of the roof collapsed). या घटनेत नायब तहसीलदार पुनम दंडिले (Deputy Tehsildar Punam Dandile) यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्या बालंबाल बचावल्या. या घटनेमुळे काही काळ तहसील कार्यालयात चांगलीच धावपळ झाली. या घटनेमुळे आता तहसीलच्या इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राहुरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दंडिले या दुपारच्या दरम्यान आपल्या दालनामध्ये बसून कामकाज करत होत्या. त्यावेळी अचानक पीयुपीचे (Pup) छत असलेला काही भाग कोसळून नायब तहसीलदार दंडिले यांच्या खुर्चीच्या फूटभर अंतरावर पडला. नशीब बलवत्तर म्हणून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, मोठा आवाज आल्याने तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ झाली. त्यावेळी एक उदमांजर (udmanjar) छताला असलेल्या पीयुपीच्या वरती पळत असताना अनेकांनी पाहिले.

नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क करून वन विभागाच्या कर्मचार्‍यांना पाचारण केले (Called Forest Department staff). वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी येऊन पाहणी केली. ते उदमांजर गेल्या दोन वर्षापासून तहसील कार्यालयात वावरत आहे. त्या उदमांजराला तहसीलच्या अनेक कर्मचार्‍यांनी पाहिले आहे. त्या उदमांजरा विषयी अनेकवेळा वन विभागाला महसूलने कळविले असता याकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे (The Forest Department deliberately ignored).

पीयुपीचे कोसळलेले छत कोणाच्या अंगावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतु नशीब बलवत्तर म्हणून आलेले विघ्न टळले. अशी चर्चा यावेळी सुरू होती. यावेळी कृष्णा पोपळघट या सर्पमित्राला बोलावून पिंजरा लावण्यास सांगितले. मात्र, तहसील कार्यालयातील कर्मचारी काम करण्यास घाबरत आहेत. या उदमांजराचा वन विभागाने लवकरच बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com