राहुरीत महिलांनी तहसील कार्यालयासमोर थापल्या भाकरी

राहुरीत महिलांनी तहसील कार्यालयासमोर थापल्या भाकरी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

पेट्रोल डिझेल (Petrol Diesel) तसेच गॅसच्या दरवाढीने (Gas Price Hike) सर्वसामान्य जनतेचे जीवन असह्य झाले असून या दरवाढीला जबाबदार असणार्‍या केंद्र शासनाचा निषेध (Central Government Protest) करतो. या शासनाला खाली ओढण्यासाठी सर्वसामान्य जनतेने आता एक होऊन वठणीवर आणावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे राहुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी केले.

गॅस (Gas), खाद्यतेल (Edible Oil) आदींनी गृहिणींचे बजेट कोलमडले असून सर्वसामान्य गृहिणींना प्रपंचाचा गाडा पुढे नेणे मुश्किल झाले असल्याची प्रतिक्रिया राहुरीच्या माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे (Mayor Dr. Ushatai Tanpure) यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुरी तहसील कचेरीवर (Rahuri Tahsil Office) जागरण गोंधळासह भाकरी थापा आंदोलन (Movement) करण्यात आले. महिला भगिनींनी तहसील कचेरीच्या आवारात बाहेरच चूल मांडून भाकरी थापून शासनाचा निषेध (Protest) केला. राहुरी पोलीस स्टेशन (Rahuri Police Station) व तहसीलच्या अधिकार्‍यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com