राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

बनावट सोने तारण ठेवून राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला सुमारे 27 लाख रुपयाला गंडा घालणार्या

20 जणांवर राहुरी तालुक्यातील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यातील सोनगाव, श्रीरामपूर पाठोपाठ जिल्हा बँकेच्या तांभेरे शाखेतही बनावट सोनेतारण घोटाळा उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तांभेरे शाखेतील एकूण 33 सोनेतारण करणारे खातेदार असून त्यापैकी 13 जणांनी शाखधिकारी आणि कर्मचार्यांनी केलेल्या पाठपुराव्यावरून वसुली सुरू केली आहे. मात्र, उर्वरित 20 जणांनी सोनेतारण प्रकरणी अद्याप एक दमडीचाही कर्जाचा परतावा न दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तांभेरे व सोनगाव शाखेतील सोने पडताळणी करणारा सराफ एकच असल्याची चर्चा असून त्याच्या संगनमताने तांभेरे शाखेतही हा घोटाळा झाला असल्याची चर्चा होत आहे.

याप्रकरणी तांभेरे शाखेचे शाखाधिकारी भाऊसाहेब माधवराव वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुरनं. 143/2021 नुसार 420, 409, 468, 471 प्रमाणे प्रकाश गिताराम पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, पूजा नवनाथ पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, सुनील उत्तम सरोदे रा. तांदुळनेर, पोस्ट तांभेरे ता. राहुरी, मंदाबाई गोपीनाथ पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, मनिषा राहुल पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, अनिल उत्तम सरोदे मु. तांदुळनेर पोस्ट तांभेरे, राहुल गोपीनाथ पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, प्रविण अरूण शिरडकर रा. सावता महाराज मंदिर, कोल्हार खुर्द ता. राहुरी, राहुल शांताराम नालकर रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, अरूण बाळासाहेब शिंदे रा. रामपूर हल्ली रा. वेताळबाबा चौक पोस्ट पाथरे ता. राहाता, माया राजेंद्र येळे रा. सावता महाराज मंदिर कोल्हार खुर्द ता. राहुरी, शुभम अंबादास बेळे रा. कानडगांव, हल्ली मुक्काम हनुमंतगांव, वाघओडा वाघचौरे विटभटटीजवळ ता. राहाता, संदिप बाळासाहेब अनाप रा. अनापवाडी पोस्ट सोनगांव ता. राहुरी, पोपट काशिनाथ थोरात रा. साईदूध संकलन केंद्र मु. सात्रळ ता. राहुरी, नवनाथ गोपीनाथ पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, अश्विनी बाळासाहेब पवार रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, रवींद्र बाळासाहेब पवार रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, बाबासाहेब सखाहरी पठारे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, संजय शंकर चिकणे रा. लक्ष्मीवाडी रामपूर ता. राहुरी, गोरक्ष राधुजी जाधव रा. माऊली मंदिराजवळ, माळेवाडी डुक्रेवाडी ता. राहुरी, या 20 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कर्जखातेदारांनी तांभेरे येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून वेळोवेळी बनावट सोने तारण ठेवून रोख रक्कम घेऊन बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काही महिन्यापूर्वी सोनगावच्या जिल्हा बँक शाखेत बनावट सोनेतारण घोटाळा उघडकीस आल्यानंतर 20 कर्जदारांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोनगाव शाखेतील बनावट सोनेतारण घोटाळ्याची कुणकुण लागताच व दोन्ही शाखेतील सोने पडताळणी करणारा सराफ एकच असल्याचे लक्षात येताच तांभेरेच्या शाखाधिकार्यांनी तातडीने सोने पडताळणी सुरू करून 33 कर्जदारांना वसुलीसाठी तगादे सुरू केले होते.

त्यापैकी 13 जणांनी टप्प्याटप्प्याने वसुली देऊ केली आहे. मात्र, उर्वरित 20 खातेदारांनी कर्जापोटी रक्कम न भरल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोनगाव, श्रीरामपूर पाठोपाठ आता तांभेरे शाखेतही बनावट सोनेतारण घोटाळा उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.