राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात उसावर तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात उसावर तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील पूर्वभागात ऊस पिकावर तांबेरा व लोकरीमावा सदृश रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने हिरवी पाने तांबूस होत चालली आहेत. त्याच्या बरोबर लोकरीमावा सदृश रोगाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.त्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालून यावर तातडीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशा परिस्थितीत ऊस पिकांवर अनेक क्षेत्रांवर या रोगाचा प्रादूर्भाव दिसत आहे. हा रोग कसा आटोक्यात आणायचा? असा प्रश्न शेतकर्‍यांना पुढे उभा राहिला आहे. अनेक कारखाने सुरू झाले असल्याने लोकरी माव्यामुळे ऊस जनावरांना चार्‍यासाठी वापरण्यास शेतकरी घाबरत असल्याने दुसर्‍याकडून ऊस विकत घेण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे अनेक दिवस उसाच्या शेतात पाणी साठल्यानेही उसाची वाढखुंटली आहे. त्यामुळे कृषी विभागाने लक्ष घालून यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे.

सुरूवातीला या रोगाचा प्रादूर्भाव पानांच्या दोन्ही बाजूस होऊन पानावर लहान, लांबट आकारांचे पिवळे ठिपके दिसत होते. आता मात्र, हे ठिपके लालसर तपकिरी दिसत असून ठिपक्यांचा भोवती फिकट पिवळसर हिरवी कडा तयार झाली आहे. त्यामुळे याचा उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com