राहुरी स्टेशन रोडवरील अपघातात एक ठार; एक गंभीर

राहुरी स्टेशन रोडवरील अपघातात एक ठार; एक गंभीर
Accident

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी स्टेशन रोडवर (Rahuri Station Road) एक चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अघतातात (accident) एक ठार (Death) तर एक अत्यवस्थ झाल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात (Accident) दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात (Accident) झाला. मानोरी (Manori) गावातील एम.एच 01 डि.के.0904 या स्वीट डिझायर आणि सीटी 100 या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. त्यामधे मानोरी (Manori) येथील दुचाकीस्वार अजमतखा पठाण (वय 60) हे ठार झाले तर त्यांची पत्नी हलीमा अजमतखा पठाण, वय 53 या गंभीर जखमी (Injured) झाल्या आहेत. त्यांना अहमदनगर (Ahmednagar) येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com