राहुरी तालुक्यातील वाहन परवानासाठी लागणारे आरटीओ कॅम्प बंद

नागरिकांची गैरसोय; दीड वर्षापासून कॅम्पसाठी चालढकल : भनगडे
File Photo
File Photo

उंबरे |वार्ताहर| Umbare

आरटीओकडून लायसन्स (License from RTO) मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यातच राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) आरटीओचे (RTO) होणारे कॅम्प बंद (Camp closed) केले गेले असल्याने नवीन लायसन घेण्यास इच्छुक असणार्‍या अनेकांची मोठी ससेहोलपट होत आहे. गेल्या दीड वर्षापासून राहुरी तालुक्यामध्ये करोनाचे कारण पुढे करून कोणत्याही प्रकारचा आरटीओ कॅम्प (RTO Camp) घेतला गेला नसल्याने अनेक तरुणांना लायसन नसल्यामुळे संतापाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाने (Shrirampur RTO Office) तातडीने कारवाई करून राहुरी तालुक्यामध्ये कॅम्प (Rahuri Taluka Camp) घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे (Hint BJP Amol Bhangade) यांनी दिला आहे.

भनगडे (BJP Amol Bhangade) यांनी सांगितले, शासनाने गेली काही दिवसांपासून ऑनलाईन वाहन चालविण्याचे लायसन्स (Online driving license) मिळण्या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू केली आहे. ही योजना चांगली असली तरी काहीजणांसाठी ती डोकेदुखी ठरली आहे. ऑनलाईन लायसन्स (Online license) मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यास आधार कार्डचा पुरावा ऑनलाईन द्यावा लागतो. मात्र, ज्यांचे आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) नाहीत आणि ज्यांच्या आधार कार्ड मध्ये चुका आहेत, अशा वाहन चालविण्याचा परवाना मिळवू इच्छिणार्‍या अनेकांचे त्यामुळे हाल होत आहेत.

आधार कार्डचे (Aadhaar card) कारण समोर आल्याने अनेकांना आरटीओमध्ये (RTO) जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र आरटीओ ऑफिस श्रीरामपूर (Shrirampur RTO office) मध्ये जाण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. ती सकाळी अकरा वाजता सुरू होते. मात्र, अगदी काही क्षणांमध्ये या सर्व अपॉइंटमेंट ऑनलाईन संपून जातात व ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ इच्छिणार्‍या अनेकांचा चांगलाच हिरमोड होतो. याबाबत श्रीरामपूर आरटीओ शी संपर्क साधून अनेक नागरिकांनी श्रीरामपूर आरटीओने (Shrirampur RTO) राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील बंगला येथे दर सोमवारी होणारे आरटीओचे कॅम्प सुरू करून वाहन परवाना पाहिजे असणार्‍या वाहनचालकांना कॅम्पमध्ये वाहन परवाना देणे संदर्भामध्ये विनंती केली.

मात्र, आजतागायत श्रीरामपूर आरटीओ ऑफिसने (Shrirampur RTO Office) याची कोणतीही दखल घेतलेली नाही. अनेक जणांनी अर्ज करून ऑनलाइन लायसन मिळत नसल्याने पेंडिंग अर्ज कॅम्पच्या (Camp) माध्यमातून तातडीने निकाली काढावेत, अन्यथा आंदोलनाचा (Movement) पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे (Hint BJP Amol Bhangade) यांनी दिला आहे.

करोनाचे कारण समोर करून राहुरी येथील आरटीओ कॅम्प बंद करण्यात आले आहेत. मग संगमनेर येथे अनेक आरटीओ कॅम्प कसे घेतले जातात? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. राहुरी तालुक्यावरच हा अन्याय का? असा प्रश्न या यानिमित्ताने भनगडे यांनी उपस्थित केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com