राहुरी शहरात तीन दुकाने फोडली; दीड लाखांचे दागिने पळविले

राहुरी शहरात तीन दुकाने फोडली; दीड लाखांचे दागिने पळविले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरहद्दीत अज्ञात भामट्यांनी 28 मे रोजी रात्रीच्या दरम्यान तीन ठिकाणी धाडसी चोर्‍या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान एक सोन्याचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किंमतीचा चांदीचा माल व काही रोख रक्कम चोरुन नेल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

मधुकर बाळकृष्ण उदावंत (रा. ताहाराबाद, हल्ली रा. भुजाडी इस्टेट, ता. राहुरी) यांचे राहुरी शहरहद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरात सराफ दुकान आहे. दि. 28 मे रोजी मधुकर उदावंत हे नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. दुसर्‍या दिवशी सकाळी दुकानाचे शटर कोणीतरी उचकटून वर केल्याचे समजले. त्यांनी दुकान उघडून पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी राहुरी पोलिसांत खबर दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

या घटनेत तीन अज्ञात चोरट्यांनी मधुकर उदावंत यांच्या दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाची उचकापाचक करून सुमारे 1 लाख 47 हजार 300 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच अनिकेत विठ्ठल भुजाडी यांचे किराणा दुकानात तसेच नकुल अर्जुन गाडे यांच्या मेडीकल व जनरल स्टोअर्स, पशुवैद्यकीय औषधांच्या मेडीकलमध्ये चोरी झाली. या घटनेबाबत उदावंत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात तीन चोरांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com