राहुरीत शिवसैनिकांचे महामार्गावर आंदोलन

राहुरीत शिवसैनिकांचे महामार्गावर आंदोलन

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच केंद्र सरकारने

अचानक पेट्रोल-डिझेलच्या वाढविलेल्या दरामुळे निषेध म्हणून शिवसेना राहुरीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी ना. दानवे यांच्या पोस्टरला जोडे मारण्याचे आंदोलन केले.

युवासेना राहुरी तालुका प्रमुख गणेश खेवरे, जिल्हा उपप्रमुख भागवत मुंगसे, कैलास शेळके आदींच्या नेतृत्वाखाली नगर- मनमाड रोडवरील मार्केट यार्ड समोर आंदोलकांनी रस्त्यावरून केंद्र शासनाचा निषेध केला. तसेच आंदोलकांनी मंत्री दानवे यांच्या पोस्टरला जोडे मारून त्यांचा निषेध केला.

यावेळी शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे, विजय शिरसाट, भाऊ खेवरे, संतोष येवले, भगवान दादा, पोपट शिरसाट आदींसह शिवसेना युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com