राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा

राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा

राहुरी (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजस्व अभियान तसेच महसूल विजय सप्तपदी अभियान अंतर्गत राहुरी तालुक्यातील सुमारे पस्तीस शिवरस्ते येत्या महिनाभरात खुले करण्याचा निर्णय राहुरीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी घेतला आहे. त्यामुळे आता या शिवरस्त्यांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार आहे. मागील आठवड्यात सुरू झालेल्या अभियानातून आतापर्यंत पाच शिवरस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

राहुरी तालुक्यातील नकाशावर दाखविलेले मात्र, अनेक वर्षानुवर्षे अतिक्रमणामुळे बंद झालेल्या शिवरस्त्यांमुळे तालुक्यातील शेतकरी व इतरांना आपला शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविणे किंवा शेती मशागतीसाठी यंत्रसामग्री शेतात येण्यासाठी जिकरीचे ठरत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ यांनी हे शिवरस्ते खुले करण्याची मागणी केली आहे. परंतु रस्त्याच्याकडेला असलेले शेतकरी यांच्या हद्दीवरून एकमत होत नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ता खुला करण्यासाठी अतिक्रमणधारक तयार नाही.

राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा
Happy Birthday Hima Das : वाचा, 'हिमा दास'च्या जिद्दीची कहाणी!

मात्र, आता यासाठी भूमी अभिलेख राहुरी, पोलीस स्टेशन राहुरी व तहसील कार्यालय राहुरी यांच्यामार्फत संयुक्तिकरित्या मोजणी करून हद्द व खुणा निश्चित करून रस्ते खुले करण्यात येणार आहेत. संबंधित रस्ते हे शासकीय रस्ते असून तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अनेक रस्त्यांच्या वादाच्या रस्त्याव्यतिरिक्त आहेत.

राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

या रस्त्यांचे नकाशे उपलब्ध असल्याने याबाबत कुठलाही खटला न चालविता नकाशाप्रमाणे खुणा करून राहुरी तहसील अंतर्गतचे ३५ रस्ते येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. यासाठी महिनाभर अभियान राबविले जाणार असून दि. ३ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत तालुक्यातील हे सर्व शिवरस्ते खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.

राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा
कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर अतिक्रमण करून काही लोकांनी शेतकऱ्यांचे येणे-जाणे जिकरीचे केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कसणे अवघड झाले आहे. मात्र, आता शिवरस्ते खुले झाल्यावर शेतीची मशागत व तयार शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविणे सोपे होणार असल्याने या अभियानाचे राहुरी तालुक्यात स्वागत होत आहे. बहुतांशी शेतकऱ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवून शिवरस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून शिवरस्त्यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे.
राहुरी तालुक्यातील ३५ शिवरस्त्यांचा श्वास होणार मोकळा
पहिली ते नववी, अकरावी वर्ग आजपासून बंद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com