राहुरी : संक्रापूरला दोन गटात हाणामारी

दोन्ही गटातील 16 जणांवर राहुरीत गुन्हा दाखल
राहुरी : संक्रापूरला दोन गटात हाणामारी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

रस्त्याचे काम पाहत असताना संक्रापूरचे (Sankrapur) सरपंच रामदास पांढरे यांना नऊजणांनी मिळून गज, दांडे व फायटरने मारहाण (beating) केल्याची घटना राहुरी (Rahuri) तालुक्यातील संक्रापूर परिसरात घडली. याबाबत राहुरी पोलिसांत (Rahuri Police) पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नऊजणांवर गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला.

दरम्यान, रस्त्याचे काम चालू असताना सिमेंट पाईप टाकण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून राजेंद्र जगताप याला दगड व लाकडी दांड्याने मारहाण (Beating) झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील (Rahuri) संक्रापूर (Sankranpur) येथे घडली असून याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सरपंच पांढरे यांच्यासह सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास पांढरे हे दि. 14 जुलै रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील संक्रापूर परिसरातील लांडेवाडी येथे रस्त्याचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी आरोपींनी गैरकायद्याची मंडऴी जमवून पांढरे यांना शिवीगाऴ करण्यास सुरुवात केली. पांढरे यांना लोखंडी फायटर व लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी साक्षीदार वाद सोडविण्यासाठी आले. तेव्हा पांढरे व साक्षीदार यांना आरोपींनी लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाऴ केली.

पांढरे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संजय संपत जगताप, नबाजी राधाकिसन जगताप, सुरेश नारायण जगताप, बाबुराव संपत जगताप, ज्ञानदेव संपत जगताप, गोकुऴ राधाकिसन जगताप, अर्जुन भाऊसाहेब होन, राजेंद्र संजय जगताप, नारायण गोकुळ जगताप सर्व रा. लांडेवाडी संक्रापूर ता. राहुरी या नऊ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक सोमनाथ जायभाय हे करीत आहेत.

दरम्यान, राजेंद्र संजय जगताप याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 14 जुलै रोजी दुपारी एक वाजे दरम्यान संक्रापूर येथील लांडेवाडी येथे यातील फिर्यादी राजेंद्र जगताप हा त्याच्या घरासमोर चालू असलेल्या रस्त्याच्या कामा लगत उभा असतांना यातील आरोपींनी गैर कायद्याची मंडऴी जमविली. रस्त्याचे चारीला सिमेंट पाईप टाकण्याच्या जागेवरुन फिर्यादी राजेंद्र जगताप व त्याचा भाऊ यांच्याशी वाद घालू लागले. यावेळी आरोपींनी त्याला दगड, लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जगताप याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून जाफर शेखलाल शेख, आखिल युसुफ शेख, रामदास बाळासाहेब पांढरे, आखिल शेख, गारवाले, बाबासाहेब अंबिर शेख, ऋषीकेश बापू पांढरे सर्व रा. संक्रापूर, पोपिज नानाभाई शेख रा. दवणगाव ता. राहुरी या सातजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संजय राठोड हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com