मुळा डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ६ जानेवारीपासून आवर्तन

मुळा डाव्या कालव्यातून सिंचनासाठी ६ जानेवारीपासून आवर्तन
File Photo

राहुरी | प्रतिनिधी

मुळा डाव्या कालव्यातून सिंचनासाठी दिनांक ६ जानेवारी पासून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी दिली.

यावर्षी झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच लाभक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहीरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे आजपर्यत आवर्तनाची आवश्यकता भासली नाही. परंतू आता विहीरींची पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे डाव्या कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांकडून आवर्तनाची मागणी करण्यात येत होती.

परंतू यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नसल्यामुळे व या कमिटयांचे अध्यक्ष जिल्हयाचे पालकमंत्री असल्याने आर्वतन सोडण्याकरीता कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे केली होती.

तसेच याबाबत त्यांच्याशी दि . ४ जानेवारी रोजी दूरध्वनीव्दारे चर्चाही केली होती. त्यानुसार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मुळा डाव्या कालव्याच्या आवर्तनास मंजूरी दिलेली असून हे आवर्तन दि .६ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. या आवर्तनाचा ऊस, ज्वारी, गहु, हरबरा व चारापिकांना लाभ होणार आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com