वळण |वार्ताहर| Valan

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे शेतकर्यांनी लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.

राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये रस्त्याची दैन्यावस्था झाल्यामुळे शेतकर्यांना लोकवर्गणीतून रस्त्याची कामे करावी लागत आहेत. त्यातच सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने राहुरीच्या पूर्वभागातही ऊस वाहतूक करणार्या साधनांची वर्दळ वाढली आहे.

वळणमध्ये अगस्ती कारखाना, प्रसाद शुगर, दौंड शुगर इत्यादी कारखान्यांची तोडणी सुरू झाली आहे. पण रस्ते नसल्यामुळे रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेची माती घेऊन रस्त्यावरच टाकण्याची वेळ आली आहे. यामध्ये वळण ते खिलारी वस्ती ते पाटापर्यंत सकाळी शेतकर्यांनी लोकवर्गणी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

रस्ता सुरळीत करून शेतकर्याला आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल? याची चिंता पडली आहे. याकरिता आपापल्यापरीने आपापल्या नेत्याकडे प्रयत्न करीत आहेत.

सध्या या तीन कारखान्यांची ऊस तोडणी सुरू झाली आहे. तर काही कारखान्यांची ऊस तोडणी पूर्ण झाली आहे. ऊस तोडणीसाठी रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. सध्या रस्त्याचे कुठेच काम सुरू नाही. दयनीय झालेल्या रस्त्यावरून आपला ऊस काढण्यासाठी शेतकरी अडचणीतून मार्ग काढत आहेत. त्यामुळे रस्ता दुरूस्तीसाठी कारखान्यांनी शेतकर्यांना जेसीबी द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.