मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा

मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा

आरडगांव | वार्ताहर

राहुरी (Rahuri) तालुक्यातील मानोरी (Manori) येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सव (Sadarddin Baba Yatra festival) दरम्यान झालेला तमाशाच्या कार्यक्रमात एका माजी उपसभापतीला मारहाण झाल्याची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा
Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला 'प्रार्थना'चा मोहक लूक, पहा फोटो

मानोरी (ता.राहुरी) येथे गेल्या दोन दिवसांपासून याञा उत्सव सरू आहे. शुक्रवारी राञी बहुरंगी लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमात किरकोळ वादातुन एका व्यक्तीने सदर तमाशा बंद करा असे फर्मान सोडल्याने माजी उपसभापती यांना स्टेजवर जाऊन लोकाग्रहास्तव हा तमाशा बंद करू नका असे म्हटल्याने या दोघात बाचाबाची सुरू झाली. नंतर उपसभापतील स्टेजवरून खाली ओढत मारहाण झाल्याची घटना घडल्याची परीसरात एकच चर्चा सुरू आहे.

मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी, 'इतक्या' कोटीचे रक्कम आणि दागिने लंपास

राञी उशीरा उपसभापतीसह ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी एकञ येत पुढील कार्यक्रम रद्द करा अशी मागणी केली आहे. यात्राचे सर्व कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले आहे.

रात्री झालेल्या वादानंतर याञा कमीटी गावातील जेष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थांची सकाळी बैठक झाली. कुस्ती हंगामा शर्यती पुढील सर्व कार्यक्रम शांततेत व्हावे म्हणून पोलीसांची बंदोबस्त बोलविण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करून शांततेत याञा उत्सव पार पाडावा यात्रा कमिटीला सहकार्य करावे.

सरपंच आब्बास शेख, (अध्यक्ष याञा कमिटी मानोरी)

मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com