राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

तिघांवर गुन्हा दाखल
राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिलांनी दोन महिलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात या दोन महिलांसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील बारागाव नांदूर येथील प्राजक्ता मुजफ्फर शेख ही पोलीस ठाण्याच्या आवारात खोटी माहिती देत आपल्या नातलगांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत असताना पोलिसांशी हुज्जत सुरू केली. त्यातील समिर शेख याने प्राजक्ता हिस पेट्रोल सदृश द्रव पदार्थाची बाटली व आगपेटी आणून दिली. गुलशन हिने तीला रोखले. मात्र, ‘आता मी पेटवून घेते’ म्हणत असताना पोलिसांनी तीचा प्रयत्न हाणून पाडला.

यावेळी घटनास्थळी उपस्थित असणार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी दोघींना ताब्यात घेऊन उपनिरीक्षक निरज बोकिल यांनी बारागाव नांदूर येथील प्राजक्ता मुजफ्फर शेख, गुलशन खुर्शिद शेख, समीर इब्राहिम पटेल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार ज्योती डोके करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com