राहुरी तालुक्यात पूर्वा नक्षत्राच्या श्रावणसरींची जोरदार बरसात

राहुरी तालुक्यात पूर्वा नक्षत्राच्या श्रावणसरींची जोरदार बरसात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

गेल्या पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर राहुरी (Rahuri) तालुक्यात गोकुळ अष्टमी (Gokul Ashtami) व पूर्वा नक्षत्राची एण्ट्री यांचा मुहूर्त साधून श्रावणसरींनी सर्वदूर जोरदार बरसात केली. सुमारे तासाभराहून अधिक वेळ पावसाने (Rain) हजेरी लावल्याने शेतकरी (Farmer) पुन्हा खूश झाले आहेत.

राहुरी तालुक्याच्या (Rahuri Taluka) पूर्व भागात वळण (Valan), मानोरी (Manori), मांजरी (Manjari), आरडगाव (Aradgav), ब्राह्मणी (Bramhani), उंबरे (Umbare) परिसरात काल सायंकाळी विजांच्या (Lightning) कडकडाटासह जोरदार पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली. तर देवळाली प्रवरा (Deolali Pravara), वांबोरी (Vambori), राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory), टाकळीमिया (Takalimiya), बारागाव नांदूर (Baragav Nandur), सोनगाव (Songav), सात्रळ (Satral), कोल्हार खुर्दलाही (Kolhar Khurd) पावसाने मुसळधार हजेरी लावून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. सायंकाळी पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे जनजीवन गारठून गेले आहे. काल श्रावणी सोमवार त्यातच गोकुळ अष्टमीचा शुभमुहूर्त वरूणराजाने गाठून पूर्वा नक्षत्रावर दमदारपणे एण्ट्री केली.

दरम्यान, पावसामुळे नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) मोठे खड्डे (Pits) पडले असल्याने अपघातात (Accident) वाढ झाली असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातही रस्ते नादुरूस्त झाले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. राहुरी शहरातही (Rahuri City) सायंकाळपासून पावसाला सुरूवात झाली. सुमारे दोन तासाहूनही अधिक वेळ पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होेते. तर ग्रामीण भागात अनेक शेतात पाणी साचल्याने शेतीला शेततळ्याचे स्वरूप आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com