राहुरीत वेटरची हत्त्या करणारा पसार आरोपी जेरबंद

राहुरीत वेटरची हत्त्या करणारा पसार आरोपी जेरबंद

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी (Rahuri) येथील साक्षी हॉटेलमध्ये (Sakshi Hotel) किरकोळ कारणावरुन वेटरची हत्या (Murder of a waiter) करुन पसार झालेला आरोपी ( Accused) बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना पुणे बसस्थानक (Pune Bus Stand), नगर (Nagar) येथून जेरबंद (Arrested) करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) ही कारवाई केली.

दि.19 रोजी मध्यरात्री नगर -मनमाड रोडवरील (Nagar-Manmad Road) राहुरी (Rahuri) शिवारातील साक्षी हॉटेल येथे वेटरचे काम करणारा नामदेव याने किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून (dispute) याच हॉटेलमध्ये काम करणारा वेटर सोनू नारायण छत्री (वय 27, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याच्या डोक्यामध्ये लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या करुन पसार झाला होता. या घटनेबाबत साक्षी हॉटेलचे मालक प्रमोद बापूसाहेब म्हसे, (रा . कोंढवड, ता. राहुरी) यांनी राहूरी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. 1789/2021, भादंवि. कलम 302 प्रमाणे आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग तसेच पोनि अनिल कटके यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची व आरोपीची माहिती घेतली. आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

त्याप्रमाणे पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ. विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रवींद्र डुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे, विजय धनेधर, चालक चंद्रकांत कुसळकर हे पथक आरोपीचा शोध घेत होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे मूळ गाव तसेच शेवगाव बसस्टँड, पाथर्डी बसस्टँड, अहमदनगर शहरातील सर्व बसस्थानके, रेल्वेस्टेशन या परिसरामध्ये शोध घेतला. याचवेळी अनिल कटके यांना पसार आरोपी नामदेव हा अहमदनगर शहरात पुणे बसस्थानक परिसरामध्ये फिरत असून तो बाहेरगावी कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे पूर्ण नाव, पत्ता नामदेव केशव दराडे, वय 30, रा. गोळेगाव, ता. शेवगांव, जि. नगर असे असल्याचे सांगितले. आरोपीने गुन्हा केला असल्याची माहिती दिल्याने आरोपीस राहुरी पो.स्टे. ला हजर करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.