
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी नगरपरिषदेच्या येणार्या निवडणुकीसाठी बारा प्रभागांतील चोवीस जागांसाठी आरक्षण सोडत नगर परिषद सभागृहात काढण्यात आली. जिल्हा पुनर्वसनच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य अधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांच्या समक्ष पाच ते सात वर्षे वयाच्या तीन मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत करण्यात आली. यामुळे अनेक इच्छुकांचा या सोडतीमुळे हिरमोड झाला असून काहींना लॉटरी लागण्याचे संकेत आहेत.
नगरपरिषदेच्या एकूण 24 जागा असून शासकीय नियमाप्रमाणे 50 टक्के म्हणजेच 12 जागा महिलांसाठी राखीव सोडण्यात आल्या आहेत. याप्रमाणे प्रत्येक प्रभागात एक महिला उमेदवार असणार आहे. चोवीस जागांसाठी निघालेल्या आरक्षणात प्रभाग एक अ मध्ये सर्वसाधारण व्यक्ती व सर्वसाधारण महिला, प्रभाग 2 अ मध्ये अनु. जाती व्यक्ती, ब मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण खुला वर्ग व महिला खुला वर्ग. प्रभाग क्रमांक चार अ अनु. जाती व्यक्ती, ब महिला खुला वर्ग. प्रभाग क्रमांक पाच अ मध्ये महिला खुला वर्ग ब सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग 6 अ मध्ये महिला खुला वर्ग ब सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग 7 मध्ये अनु.जाती महिला व ब सर्वसाधारण. प्रभाग 8 अ साठी अनु. जमाती व्यक्ती व ब साठी महिला खुला वर्ग. प्रभाग 9 अ मध्ये महिला खुला वर्ग व ब साठी सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग 10 अ मध्ये महिला खुला वर्ग व ब सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग 11 अ साठी अनु. जमाती महिला व ब सर्वसाधारण व्यक्ती. प्रभाग 12 अ अनु. जाती महिला व ब सर्वसाधारण व्यक्ती याप्रमाणे चोवीस जागांसाठी आरक्षणे निघाली असून शासन नियमाप्रमाणे ओबीसी आरक्षण विना या सोडती काढण्यात आल्या. शासननिर्णय आल्यास यामध्ये बदल केला जाऊ शकतो किंवा नव्याने आरक्षणे काढली जातील अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, विरोधी पक्षनेते दादा सोनवणे आदींसह नागरिक उपस्थित होते.