राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी 'यांची' झाली बिनविरोध निवड

राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी 'यांची' झाली बिनविरोध निवड

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपरिषदेच्या (Rahuri Municipal Council) उपनगराध्यक्षपदी (Deputy-President) सत्ताधारी जनसेवा आघाडीच्या नगरसेविका सौ. नंदा बाळासाहेब उंडे (Nanda Balasaheb Unde) यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

काल बुधवारी दुपारी दोन वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात (Municipal Council Hall) मावळते उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी (Deputy President Suryakant Bhujadi) यांनी राजीनामा (Resigned) दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी प्रांताधिकारी दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी आघाडीच्या वतीने सौ. नंदाताई उंडे यांचे गटनेत्या डॉ. सौ. उषाताई तनपुरे व सौ. अनिता पोपळघट तसेच दुसर्‍या अर्जावर नंदकुमार तनपुरे व सौ. ज्योती तनपुरे यांच्या सूचक व अनुमोदक स्वाक्षर्‍यांद्वारे दोन अर्ज भरण्यात आले. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्याने प्रांताधिकारी दयानंद जगताप यांनी सौ. उंडे यांची बिनविरोध निवड घोषित केली.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे (Rahuri Municipal Council CEO Shriniwas Kure) यांची पदोन्नतीवर अहमदनगर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाल्याबद्दल त्यांचाही नगरपरिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे (State Minister Prajakat Tanpure), माजी खा. प्रसाद तनपुरे, ज्येष्ठनेते अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवा देण्याबरोबरच शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर सौ. उंडे यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सौ. संगीता आहेर, दिलीप चौधरी, विलास तनपुरे, सुमती सातभाई, सूर्यकांत भुजाडी, गजानन सातभाई आदी उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड (Unopposed selection) पार पाडल्याबद्दल नगराध्यक्ष अनिल कासार यांनी अधिकारी व नगरसेवकांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com