दूध दरवाढीसाठी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक

दूध दरवाढीसाठी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक

आरडगांव | वार्ताहर

दूध दरवाढीसाठी राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दूध दरवाढीसाठी राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुग्धाभिषेक घालुन चाबकाने फोडत, घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.

दूध दरवाढीसाठी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पवार, माऊली निशाणे, विजय देठे, आप्पासाहेब पवार, नानासाहेब काळे, भगिरथ पवार, पवन पवार आदी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालुन चाबकाने फोडण्यात आले आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सतिश पवार म्हणाले कि, 'राज्यात रोज सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन होते. दुधाची रोजची उलाढाल १०० कोटी रुपये आहे. १ कोटी २० लाख दुध उत्पादकांच्या पोटावर हे राज्य सरकार पाय देत आहे. ऊस, सोयाबीन, कांदा गहु या पिकांची वार्षिक उलाढाल ऐका बाजुला व दुधाची उलाढाल ऐका बाजुला असं चित्र आहे.' तसेच 'दुधाला किमान ३० रुपये भाव मिळाला पहिजेत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल', असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Related Stories

No stories found.