राहुरीत भरपेठेत दोन तरूणांनी केली दगड व विटाने मारामारी

राहुरीत भरपेठेत दोन तरूणांनी केली दगड व विटाने मारामारी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर दोन तरूणांमध्ये आपापसात दि. 7 जून रोजी दगड व विटाने एकमेकांना मारहाण झाली. सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी सागर गुंजाळ व लक्ष्मण दळे या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार आजिनाथ पाखरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सायंकाळी 7 वाजे दरम्यान यातील आरोपी सागर अशोक गुंजाळ रा. आझाद चौक, राहुरी, लक्ष्मण सोपान दळे रा. गणपती घाट, राहुरी हे दोघेजण शहरातील स्टेशनरोड परिसरात असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या गेटसमोर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आपापसात एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्कयाने मारहाण करत होते.

यावेळी हवालदार सचिन ताजणे यांनी त्यांना मारामारी करू नका, शांत रहा. असे सांगितले. मात्र, त्या दोघांनी ऐकले नाही. कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची भांडणे सोडविली. यावेळी आरोपी सागर अशोक गुंजाळ याला ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी लक्ष्मण सोपान दळे हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com