राहुरी बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात सोयाबीनला 6 हजार भाव

राहुरी बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात सोयाबीनला 6 हजार भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी बाजार समितीचे (Rahuri Market Committee) उपबाजार (Sub Market) आवार वांबोरी (Vambori) येथे सोयाबीनला (Soybean) 6 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला. राहुरी बाजार समितीचे (Rahuri Market Committee) उपबाजार (Sub Market) आवार केंद्र वांबोरी (Vambori) येथे चालू सप्ताहामध्ये सोयाबीन (Soybean) शेतमालाची आवक 190 क्विंटल झाली. बाजारभाव 5300 ते 6000 पर्यंत मिळाला. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे (Speaker Arun Tanpure) यांनी शेतकरी बांधवांनी आपले सोयाबीनची (Soybean) विक्री बाजार समितीचे आवारात करावी. याबाबत बाजार समितीचे सचिव पी. पी. डुक्रे यांनी शिवार खरेदीबाबत शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची शाश्वत हमी नसून इतर ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबत शेतकरी बांधवांनी विचार करावा. तसेच बाजार समितीत चालू बाजारभावाप्रमाणे शेतमालाला बाजारभाव (Market Prices for Agricultural Commodities) मिळत असतात.

शेतकरी बांधवांनी सोयाबीन हंगामा अगोदर जास्तीचे बाजारभाव पाहिले असल्याने आज रोजी सोयाबीन (Soybean) हंगामात ते भाव नसल्याने शेतकरी बांधव आपले सोयाबीन (Soybean) टप्याटप्याने बाजारात विक्री करत असल्याने बाजारभावात चढ्या स्वरुपात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com