राहुरी बाजार समितीत कांद्याला 2 हजार रुपये भाव

राहुरी बाजार समितीत कांद्याला 2 हजार रुपये भाव

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी बाजार समितीच्या मुख्य आवारात 21063 गोण्यांची आवक कांद्याची होऊन उन्हाळ कांद्याला 100 ते दोन हजार रुपयेपर्यंत भाव मिळाला. बाजार समितीमध्ये आलेल्या कांद्याला सरासरी एक हजार ते सोळाशे एकनंबर, 501 ते 1000 दोननंबर तर शंभर ते पाचशे तीननंबर याप्रमाणे बाजारभाव मिळाले.

तर गोल्टी कांद्याला पाचशे ते बाराशे रुपयापर्यंत भाव मिळाले. दोन हजार रुपयांनी 11 गोण्या, 1755 रुपयांनी अकरा गोण्या, 1740 पंधरा गोण्या, 1725 एकूण वीस गोण्या तर सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत 231 गोण्या याप्रमाणे अपवादात्मक भाव निघाले.

बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात 9565 गोण्यांची आवक होऊन बाजारभाव 1200 ते 1600 एक नंबर, दोन नंबर 800 ते 1995, तीन नंबर 100 ते 795 तर गोल्टी कांद्याला पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांबोरी उपबाजारातही अपवादात्मक गोण्यांना 1900 ते सतराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com