आरडगाव येथे दोन मोटारसायकलची समोरसमोर धडक

आरडगाव येथे दोन मोटारसायकलची समोरसमोर धडक

सातजण जबर जखमी

आरडगांव |वार्ताहर| Aradgav

राहुरी मांजरी रस्त्यावर आरडगांव येथे समोरासमोर दोन मोटारसायकलच्या जबरदस्त धडकेत सात जण जबर जखमी झाले आहे. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरडगाव येथे दोन मोटारसायकलची समोरसमोर धडक
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

आरडगांव परिसरात संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली, त्यामध्ये मानोरी येथील अक्षय आढाव, ऋतुराज काळे, मयूर मोरे हे मानोरीकडे घराच्या दिशेने जात होते व कोंढवड येथील अजय बर्डे, किरण माळी, दोन लहान मुले हे राहुरीच्या दिशेने घरी जात आसताना हा अपघात घडला आहे. ही घटना घडताच गावातील सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नवयुवक धावून राहुरी येथील रुग्णवाहिका व देवळाली प्रवरा येथील रुग्णवाहिका यांना तातडीने फोन करून जखमींना शिर्डी व नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये काही जणांची अवस्था चिंताजनक असल्याचे समजते.

राहुरी मांजरी रस्त्यावर वारंवार अपघात होत आसल्याने या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. हे काढून या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com