आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील जनावरांना लंम्पी या संसर्गजन्य रोगाने पछाडले आहे. या आजाराने बाधित झालेल्या

गाय, म्हैस व कालवडी या जनावरांत मोठ्या प्रमाणात हा रोग फैलावल्याने या आजारा मुळे अनेक जनावरे दगावले जाऊ शकतात. त्यामुळे संबंधित पशुसंवर्धन विभागाने या रोगावर प्रतिबंधक उपाययोजना करून तातडीने बाधित जनावरांवर उपचार सुरू करावा व पशूपालकांना दिल्यासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

ओडीसा राज्यातून महाराष्ट्रात गडचिरोली येथे सर्वात प्रथम हा सन 2019 साली लंम्पी या नावाचा महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यामुळे शेतकर्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता रोगाचा फैलाव राहुरी तालुक्यात होताना दिसून येत आहे. हा संसर्गजन्य असून एका जनावरांपासून दुसर्या जनावरांमध्ये झपाट्याने फैलावत जातो.

या रोगाची डास, चावा घेणार्या माशी, गोचीड, यापासून उत्पती होते. या रोगांची लक्षणे जनावरांना ताप येणे, तोडांवर सुज येणे, डोळ्यातून व नाकातून श्राव गळणे, भूक मंदावणे, अंगावर फोड येणे, एक इंच आकाराच्या नाकात व तोंडात गाठी येणे, पायाला सुज येणे, त्यामधून रक्तस्त्राव होणे, न्युमोनिया होणे, ही लक्षणे आढळून आल्यास पशूसंवर्धन विभागाला संपर्क करणे गरजेचे आहे. हा लंम्पी रोग संसर्गजन्य असल्याने जनावरांमधे झपाट्याने फैलावतो. त्यामुळे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जनावरे मुत्युूमुखी पडू शकतात.

परंतु माणसाला यापासून कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. अशा प्रकारचे काही लक्षणे आढळून आल्यास शेतकर्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. पशूवैद्यकीय विभागामार्फत लस उपलब्ध करून शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

आमच्या जनावरांना लंम्पी या महाभयंकर रोगाची लागण झाली असल्याने दुधाला भाव कमी व खाद्याला भाव जास्त असल्याने आम्हाला लंम्पी रोगाची लस खासगी दवाखान्यातून घेणे परवडत नसल्याने पशूवैद्यकीय विभागा मार्फत लस उपलब्ध करून द्यावी.
- संतोष धसाळ, दुग्ध व्यावसायिक, शेतकरी तांदुळवाडी.

लंम्पी रोग परराज्यातून आला असल्याने हा रोग संसर्गजन्य असून एका जनावरापासून दुसर्या जनावरांना होऊ शकतो. ज्या जनावरांना झालेला असेल त्या जनावरांना इतरांपासून बाजूला बांधून इतर जनावरांना होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. या आजाराची मूळ लक्षणे जनावरांना ताप येणे, अंगावर एक इंच आकाराच्या गाठी येणे, पायला सूज येणे ही लक्षणे आढळून आल्यास पशूसंवर्धन विभागाकडे संपर्क करावा. शासनाकडे घटसर्प, लाळ्या खुरकूत, फर्या, पीपीआर, आंत्रविषार, थायलेरिया, बसेलोसी, या गाई, म्हैस, वासरे व शेळ्या-मेंढ्या या जनावरांना तसेच कोबड्यांसाठी लासोटा, फाऊल पॉक्स, आरडी या रोगाच्या लस उपलब्ध आहेत. ती लस पावसाळ्याच्या आधी जनावरांना दिली जाते. लंम्पी हा नवीन आजार असल्याने याची लस शासनाकडे अद्याप उपलब्ध नाही. ही लस खासगी मेडिकलमध्ये उपलब्ध असून ज्या ठिकाणी हा आजार फैलावत आहे, त्या शेतकर्यांनी पशूवैद्यकीय दवाखान्याशी किंवा खासगी डॉक्टरांच्या मार्फत लस टोचून घेतल्यास या आजारवर नियंत्रण आणू शकतो. हा आजार माणसांना होत नाही.
- डॉ. योगेश गालम सहाय्यक पशुधन विकासअधिकारी, मानोरी श्रेणी-2