राहुरी खुर्दला सरपंचपदासाठी चुरस वाढणार

8 जुलैला सरपंचपदाची निवड
राहुरी खुर्दला सरपंचपदासाठी चुरस वाढणार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) राजकीय (Political) दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या राहुरी खुर्द ग्रामपंचायतीच्या (Rahuri Khurd Grampanchayat) सरपंचपदासाठी (Sarpanch Election) मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चिन्ह आहेत. दि. 8 जुलै रोजी सरपंचपदासाठी सदस्यांमधूनच निवड (Members Selected) होणार असल्याने सत्ताधार्‍यांची प्रतिष्ठा तर विरोधकांचे अस्तित्व या निवडीत पणाला लागणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी सरपंचपदासाठी जोरदार फिल्डींग लावल्याने अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या या निवडीकडे राहुरी तालुक्याच्या राजकीय (Political) वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. पुन्हा सदस्यांमधून निवड होणार असल्याने राहुरी खुर्द ग्रामपंचायतीवर तनपुरे गटाची (Tanpure party) बहुमताच्या जोरावर निर्विवाद सत्ता अबाधित राहणार असल्याची चर्चा होत आहे.

राहुरी खुर्द ग्रामपंचायत सरपंचपद हे सर्वसाधारण महिला या पदासाठी राखीव आहे. राहुरी खुर्दच्या सरपंच सौ. निर्मलाताई मालपाणी यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले आहे. त्यासाठी पुन्हा फेरनिवडणूक (Re-election) होणार आहे. दरम्यान, राहुरी खुर्द ग्रामपंचायतीत माजी खा. प्रसादराव तनपुरे (Prasadrao Tanpure) यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (State Minister Prajakt Tanpure) यांच्या नेतृत्वाखाली एकूण 17 सदस्यांपैकी 11 सदस्य असून त्यांच्या सत्ताधारी जनसेवा मंडळाचे 11 सदस्य असल्याने बहुमत तनपुरे गटाकडेच आहे.

तर विरोधी विकास मंडळ प्रणित लोकसेवा मंडळाचे नेतृत्व डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस (NandKumar Dolas) हे करीत असून त्यांच्या विरोधी गटाचे अवघे 6 सदस्य असल्याने त्यांना पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागणार असल्याचे संकेत आहेत. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. ग्रामपंचायतमध्ये सात महिला (Seven Women) निवडून आल्या असून यापैकी सत्ताधारी तनपुरे गटाच्या तीन व विरोधी गटाच्या चार अशा महिला निवडून आल्या आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (State Minister Prajakt Tanpure) यांनी गावातील विकास कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत विकासाचा टप्पा गाठणे शक्य झाले. मात्र, सध्या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, पथदिवे अशा प्रश्नांचे आव्हान सत्ताधारी गटासमोर असून नुतन महिला सरपंच हे प्रश्न तातडीने सोडवितील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com