Video : केंदळ खुर्द महिलांसह ग्रामस्थांचा स्वातंत्रदिनी उपोषणाचा इशारा

आरडगांव | वार्ताहर

राहुरी (Rahuri) तालुक्यातील केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या (Kendal Khurd Grampanchayat) पदाधिकाऱ्यांकडून गावातील समस्या सुटत नसल्याने दि.१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांसह ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा दिला आहे.

गावातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले गाव अंतर्गतरस्ते, पिण्याचे व वापराचे पाणी, नादुरुस्त पाण्याची टाकी, बंदिस्त गटार योजना, प्रलंबित घरकुल प्रश्न, पिण्याच्या पाण्यावरील अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक मोटारी बंद करण्यात यावे या बाबतचे लेखी निवेदन दि .२१ मे रोजी ग्रामपंचायकडे देण्यात आले होते.परंतु कुठलेही उत्तर न मिळाल्याने १३ जुलै रोजी राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे माणिक आढाव, गहिनीनाथ राशिनकर, प्रकाश आढाव, सचिन गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, दीपक आढाव, विजय आढाव, बाबासाहेब आढाव, सोमनाथ झिने, लक्ष्मण जाधव, लहानु जाधव, सुरेश जाधव, गुलाब गोलवड, विलास मोरे, ताराचंद केदारी, बबन केदारी, सुरेश गोलवाड,अनिल माळी, विजय आढाव, किशोर जाधव, भरत माळी, सुनील जाधव, इंदुबाई केदारी अनिता पाटोळे ताई आढाव संगीता मनतोडे सुरेखा जाधव संगीता केदारी आदि महिलांनसह ग्रामस्थांनी दि १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com