पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणी फरार आरोपीला अटक

परराज्यात जाऊन पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणी फरार आरोपीला अटक

राहुरी | प्रतिनिधी

राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी व तोफिक मुक्तार शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. तसेच सदर गुन्हा Dysp संदीप मिटके यांचेकडे वर्ग होताच गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याला नगर-औरंगाबाद रोडवरील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान समोरील हॉटेल गुरुदत्त येथून अटक केली होती.

परंतु अक्षय कुलथे हा फरार होता. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश मधील चटिया ता. बीनंदनकी जिल्हा-फत्तेपूर येथून शिताफीने अटक केली. आरोपीला उत्तरप्रदेशातील स्थानिक न्यायालयात केले असता आरोपीस ७२ तासांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com