कर्तव्य म्हणून डॉक्टरांनी केले स्वत:च्या संपूर्ण गावाचे लसीकरण

डॉ. सतिष सोनवणे यांचा धामोरीगावात उपक्रम
कर्तव्य म्हणून डॉक्टरांनी केले स्वत:च्या संपूर्ण गावाचे लसीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)-

राहुरी (Rahuri) तालुक्यातील धामोरी खुर्द (Dhamori Khurd) येथील भूमिपुत्र, नगर शहरातील मॅककेअर (Maccare Superspeciality Hospital) हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सतीश सोनवणे (Oncologist Dr. Satish Sonawane) यांच्या पुढाकारातून कै. धोंडीभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वखर्चाने व आरोग्य विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावातील ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उदिद्ष्ट ठेवले आहे. लसीकणाच्या गतीसाठी कर्तव्य डॉ. सोनवणे यांनी स्व खर्चातून उचललेया या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

गावातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी भूमिपुत्र सरसावले आहेत. डॉ. सोनवणे यांनी कै. धोंडीभाऊ सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य विभाग व मॅक केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (4 सप्टेंबर) गावात शंभर टक्के लसीकरणाचे उदिद्ष्ट साध्य करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मॅककेअरचे संचालक डॉ. प्रशांत पटारे, डॉ. अविनाश जाधव, सरपंच सुनीताताई पवार, उपसरपंच मच्छिंद्र सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, डॉ. निलेश उगले, बाबासाहेब सोनवणे, भाऊसाहेब जाधव, ग्रामसेविका वाघ यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

शिबीराच्या पहिल्याच दिवशी बाहेरगावी गेलेल्या नागरीकांव्यतिरिक्त गावातील 18 वर्ष वयापुढील सर्वांचे लसीकरण करण्यात आले. एकीकडे तासनतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नसतांना धामोरी खुर्द गावातील सर्वांना लस मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. डॉ. सोनवणे हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरोग्य परिषदांमध्ये सहभागी झालेले आहेत. करोना विषयक टास्क फोर्समध्ये (Corona Task Force) काम करून आरोग्य विभागाला मार्गदर्शन करतात. डॉ. सोनवणे यांनी लासिकरणाबाबत जनतेला फक्त आवाहन न करता स्व खर्चाने लसीकरण करण्याचा निर्णय घेत समाजापुढे नवा आदर्श उभा केला आहे. यावेळी डॉ. सांगळे यांनी डॉ. सोनवणे यांच्या उपक्रमाचा आदर्श समोर ठेवत इतरांनीही असा प्रयोग करणे गरज आहे. डॉ. पटारे यांनी धामोरी खुर्द गावातील ज्या व्यक्तींचे लसीकरण राहिले असेल त्यांनी नगर शहरात मॅक केअर हॉस्पिटलमध्ये येऊन मोफत लस घ्यावी असे आवाहन केले आहे. यावेळी त्र्यंबक सोनवणे, रावसाहेब सोनवणे, रामनाथ सोनवणे, अभय सोनवणे, रामनाथ शिंदे, संदीप सोनवणे, दिनकर गायके, बापूसाहेब जाधव, खंडू पाटील जाधव, सतीश हरिष्चंद्रे, गोरख जाधव, विकास हरिष्चंद्रे, देवराम खेडेकर, भारत पुरी, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com