पती-पत्नीला मारहाण; चार जणांवर गुन्हा

पती-पत्नीला मारहाण; चार जणांवर गुन्हा

राहुरी (प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे आरोपी सामाईक बांध कोरत होते. यावेळी बांध कोरण्यास मनाई करणाऱ्या लोकांना कुऱ्हाड, खुरपे व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना दि. १९ सप्टेंबर रोजी घडली.

बाळासाहेब एकनाथ आचपळे (वय ४०, रा. तिळापूर ता. राहुरी) यांनी राहरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तिळापूर येथील जोगेश्वर मंदिराजवळ या घटनेतील आरोपी बाळासाहेब आचपळे यांचा सामायिक बांध कोरत होते.

तेव्हा बाळासाहेब आचपळे, त्यांची पत्नी व मुलगा हे तेथे गेले व त्यांना म्हणाले, आपण सरकारी मोजणी आणून मोजणी करून घेऊ. तुम्ही आता आपला सामायिक बांध कोरू नका. याचा त्यांना राग आल्याने आरोपींनी आचपळे, त्यांची पत्नी रेखा व मुलगा प्रवीण यांना कुऱ्हाड, खुरपे व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

आचपळे यांच्या फिर्यादीवरून जगन्नाथ एकनाथ आचपळे, संगीता जगन्नाथ आचपळे, बबलू जगन्नाथ आचपळे, भारती बबलू फळे सर्व रा. तिळापूर ता. राहरी या चारजणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com