गुंजाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

आरोपी अटकेत
गुंजाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मी तुला 500 रुपये देतो, तू माझ्या बरोबर चल. असे म्हणून एका शाळकरी मुलीचा वाईट हेतूने हात पकडला. तिला लज्जा उत्पन्न होईल (Shame will Arise), असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) गुंजाळे (Gunjale) येथे दि. 27 एप्रिल रोजी घडली.

गुंजाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग
श्रीरामपुरात येणारे दीड कोटीचे स्पिरीट संगमनेरात जप्त

दि. 27 एप्रिल रोजी दुपारी एक वाजे दरम्यान ती अल्पवयीन मुलगी (Minor Girl) शाळेतून घरी जात होती. दरम्यान गुंजाळे परिसरातील भाऊसाहेब नवले यांच्या वस्तीजवळ आरोपी अरूण सरोदे हा त्याच्या दुचाकीवर (Bike) आला. तो त्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) म्हणाला, मी तुला 500 रुपये देतो. तू माझ्याबरोबर चल. असे म्हणून त्याने त्या मुलीचा वाईट हेतूने हात धरला. नंतर तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. या घटनेतील फिर्यादी व साक्षीदार यांनी आरोपी अरूण सरोदे याला पकडून राहुरी पोलिसांच्या (Rahuri Police) ताब्यात दिले.

गुंजाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग
अवैध वाळू वाहतुकीवर डीवायएसपी पथकाची कारवाई

राहुरी पोलिसात (Rahuri Police) दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी अरूण रावसाहेब सरोदे रा. गुंजाळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a case of molestation) करून त्याला ताबडतोब अटक (Arrested) करून गजाआड केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत.

गुंजाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग
राहुरी तालुक्यातील 8 गावांतील पाणीयोजनेसाठी 13 कोटी 83 लाख

Related Stories

No stories found.