बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यात आढळला

हत्या की आत्महत्या?
बेपत्ता असलेल्या 'त्या' व्यक्तीचा मृतदेह मुळा धरणाच्या पाण्यात आढळला

राहुरी फॅक्टरी | वार्ताहर

येथील गुलाब रानुजी मोढवे या काल सकाळ पासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी वावरथ-जांभळी शिवारात मुळा धरण्याच्या पाण्यात कडेला तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मयत गुलाब मोढवे हे काल सकाळी सात वाजता कामानिमित्त बाहेर चालल्याचे सांगून घराबाहेर पडले दिवसभर त्यांचा फोन बंद होता, रात्री घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्वरित पोलीसासी संपर्क साधून मिसिंग दाखल केली.

आज सकाळपासून गुलाब मोढवे बेपत्ता असल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरत असतानाच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांच्या जनसंपर्क मुळे जांभळी परिसरात धरणाच्या कडेला पाण्यात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच धनराज गाडे यांनी वावरथचे सरपंच रामदास बाचकर व बारागाव नांदूरचे सरपंच निवृत्ती देशमुख यांना बरोबर घेऊन घटनास्थळी जाऊन खात्री केली असता हा मृतदेह गुलाब मोढवे यांचा असल्याची खात्री केली व पोलीस स्टेशनला माहिती दिली.

दरम्यान गुलाब मोढवे हे विमा व आरटीओ प्रतिनिधी म्हणून म्हणून काम करीत असल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क होता. अत्यंत मितभाषी व सतत हसतमुख असलेल्या गुलाब मोढवे यांच्या या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com