लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

लाच मागितल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

राहुरी | Rahuri

राहुरी (Rahuri) तालुक्यातील तांदुळवाडी (Tandulwadi) येथील ग्रामसेवकाने घराच्या जागेची दप्तरी नोंद लावण्यासाठी ७ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी ग्रामसेवकासह पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे स्टेशन येथील एकाच्या फिर्यादी वरून ग्रामसेवक अभय भाऊराव सोनवणे व ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नवनाथ बाळासाहेब धसाळ यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुरन.व कलम ५७९\२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अ १२ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे की, पहिली पत्नी हिच्या नावावर तांदुळवाडी शिवारात गट नंबर ३९ पैकी २ आर घर जागा दुसरी पत्नी हिच्या नावे नोटरी करून दिली होती. सदर जागेची ग्रामपंचायतमध्ये दप्तरी नोंद ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडून करून घेण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी धसाळ याने ७ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यामुळे सदर ग्रामसेवक आणि पाणीपुरवठा कर्मचारी या दोघांवर लाच मागितल्याचा गुन्हा राहुरी पोलीस ठाण्यात गुरूवार दि.२२ जूलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर यांच्यासह सापळा पथक दीपक करंडे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगूल, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, पोलीस नाईक राहुल डोळसे आदींनी केली असून पुढील तपास पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com