राहुरीच्या पूर्वभागातील पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

काही इच्छुकांचा होणार हिरमोड तर काहींना अचानक सत्तेचा लाभ
राहुरीच्या पूर्वभागातील पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यात विविध सहकारी संस्था, साखर कारखाना, दोन नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा ढोल वाजत असताना आता राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द या पाच ग्रामपंचायतींचाही बिगुल वाजणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता या पाचही ग्रामपंचायतींची ग्रामपंचायत सदस्यनिहाय राखीव सोडती जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी या ग्रामपंचायतींच्या विशेष ग्रामसभाही घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता आरक्षणाचा राजकीय फायदा आणि तोटा कोणाला होणार? याबाबत गावकट्ट्यांवर गप्पांचे राजकीय फड रंगू लागले आहेेत. या आरक्षणात काही इच्छुकांचा हिरमोड तर काही इच्छुकांना सत्तेची लॉटरी लागणार आहे.

त्यामुळे आता इच्छुकांसह गावपातळीवरील नेत्यांनीही सावध पावले टाकत निवडणुकीसाठी राजकीय व्यूहरचना सुरू केली आहे. त्यामुळे आता राहुरीच्या पूर्वभागात पुन्हा एकदा ग्रामीण वातावरण ढवळून निघणार आहे.

दरम्यान, आरडगाव, मानोरी, केंदळ खुर्द या तीन ग्रामपंचायतींची मुदत दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी संपणार आहे. त्यामुळे आगामी पाच महिन्याच्या कालावधीत इच्छुकांना मोठी संधी चालून आली आहे. पर्यायाने या तीनही ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण आता ऐन पावसाळ्यात गरमागरम राहणार आहे. वाघाचा आखाडा ग्रामपंचायतीत एकूण सात जागा आहेत. प्रभाग 3 पैकी प्रभाग क्र.1 मधून 3 जागा अनुसूचित जमाती व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 2, प्रभाग 2 जागा - 2, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग - 3, जागा 2, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1 अशा एकूण सात जागेसाठी निवडणूक होणार आहे.

आरडगाव ग्रामपंचायतीत एकूण 11 जागा आहेत. प्रभाग क्रमांक 4 पैकी प्रभाग क्र.1 मधून 2 जागा अनुसूचित जाती (एस.सी) व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 2 जागा 3, अनुसूचित जमाती (एस.टी) महिला 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, तर सर्वसाधारण महिला 1, प्रभाग - 3 जागा 3, अनुसूचित जमाती (एसटी) महिला 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 4 जागा 3, अनुसूचित जमाती (एसटी) व्यक्ती 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1 अशा एकूण 11 जागेसाठी आरक़ण आहे.

केंदळ खुर्द ग्रामपंचायतीत एकूण नऊ जागा आहेत. प्रभाग 3 पैकी प्रभाग क्र.1 मधून 3 जागा सर्वसाधारण व्यक्ती 1, अनुसूचित जमाती (एसटी) महिला 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 2 जागा 3, अनुसूचित जमाती व्यक्ती 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 3 जागा 3, अनुसूचित जाती (एस.सी) व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 2, अशा एकूण नऊ जागेसाठी आरक्षण निघाले आहे.

मानोरी ग्रामपंचायत एकूण 13 जागा आहेत. प्रभाग क्रमांक 5 पैकी प्रभाग क्र.1 मधून 2 जागा अनुसूचित जाती (एस.सी) व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 2 जागा -2, सर्वसाधारण महिला 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, प्रभाग - 3 जागा 3, सर्वसाधारण महिला 2, सर्वसाधारण व्यक्ती 1, प्रभाग 4 सर्वसाधारण महिला 2, सर्वसाधारण व्यक्ती 1, प्रभाग 5 जागा 3, अनुसूचित जाती (एस.सी) महिला 1, अनुसूचित जमाती (एसटी) व्यक्ती 1, सर्वसाधारण व्यक्ती 1 अशा एकूण 13 जागेसाठी आरक्षण आहे.

तांदुळवाडी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 3 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 2, सर्वसाधारण महिला 1, प्र.क्र. 2 मध्ये 3 जागा, अनुसूचित जाती व्यक्ती 1, अनुसूचित जाती महिला 1, सर्वसाधारण महिला 1, प्र.क्र.3 तीन जागा, सर्वसाधारण व्यक्ती 1, अनुसूचित जाती महिला 1, सर्वसाधारण महिला 1, प्र.क्र.4 मध्ये 2 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, प्र.क्र.5 मध्ये 2 जागा, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1 असा समावेश आहे. वाघाचा आखाडा-तांदूळवाडी समूह ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट 2020 मध्ये मुदत संपली असून सध्या या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज सुरू आहे.

राहुरीच्या पूर्वभागातील या पाच ग्रामपंचायतीत एकूण 53 जागा आहेत. त्यापैकी 27 जागेवर महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे राहुरीच्या पूर्वभागात 50 टक्के महिला सत्तेवर बसणार असल्याने आरक्षणाची जागा गमविलेल्या अनेक कारभार्‍यांनी आता आपल्या कारभारणीला सत्तास्थानी बसविण्यासाठी राजकीय आटापिटा सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com