वळण |वार्ताहर|Valan

राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये हरभरा पीक साेंंगणीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेतकर्यांची रानात हरभरा काढणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

हरभरा हे पीक चार महिन्यांचे असून हरभरा हे एकाच पाण्यावर येणारे पीक आहे. हरभरा हे पीक शेतात घेतल्यावर शेतीचा पोत सुधारतो. त्यानंतर दुसर्या पिकाला एकदम जोमाने बाळसे येते. त्यानंतर जास्त खते घालण्याची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे शेतकरी वळण, मानोरी, पाथरे, मांजरी, कोपरे, शेनवडगाव इत्यादी गावांमध्ये शेतकरी हरभरा हे पीक जास्त घेतात.

हरभर्याचे एकरी अॅवरेज आठ ते दहा क्विंटल निघते. हरभर्याला चांगल्यापैकी भावही मिळतो. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळते, असे शेतकरी बाबासाहेब रखमाजी खुळे, विक्रम कारले, एकनाथ खुळे, खंडू भाऊ जाधव, भागवतराव निमसे, मुकुंदा काळे, सुरेश आढाव, किशोर आढाव आदी शेतकर्यांनी सांगितले.