राहुरी शहरात मोकाट फिरणार्‍यांची करोना चाचणी

94 पैकी दोनजण बाधित आढळले ; व्यापार्‍यांवरही कारवाई
राहुरी शहरात मोकाट फिरणार्‍यांची करोना चाचणी

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी नगरपरिषदेने संयुक्त कारवाई करून शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांची करोना चाचणी केली. यावेळी दोनजण करोनाबाधीत आढळून आल्याने त्यांना तातडीने कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तसेच प्रशासनाचे आदेश धुडकावून लावणार्‍या काही व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

राहुरी शहरासह तालुक्यात करोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यासाठी अनेकदा उपाय योजना करुनही विनाकारण फिरणार्‍या नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी तसेच करोनाला थोपविण्यासाठी रस्त्यावर मोकाट फिरणारे यांची करोना तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. दोन दिवसात 94 लोकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली असता दोघे पॉझिटिव्ह सापडल्याने प्रशासनाने तातडीने त्यांची रवानगी कोव्हिड केअर सेंटरला केली.

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, पोलीस नाईक महेंद्र गुंजाळ, नगरपरिषदेचे महेंद्र ताकपीरे, सुनील कुमावत, राजेंद्र खंगले, राजू शेख, शिरसाठ, बाचकर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com