राहुरी फॅक्टरीवर उसनवारीवरून महिलेला मारहाण

राहुरी फॅक्टरीवर उसनवारीवरून महिलेला मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

तुमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीश वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. 27 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली.

तस्लीम बेगम मशीहूल हसन खान (वय वर्षे 50, रा. समर्थ नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान तस्लीम बेगम खान या त्यांच्या घरात होत्या. त्यावेळी तेथे आरोपी सतीश वाघ व इतर तीन अनोळखी इसम हे तस्लीम बेगम खान यांच्या घरात घुसले. त्यांना म्हणाले, तुमच्या मुलाला हात उसने दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने आरोपींनी तस्लीम बेगम खान यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

तस्लीम बेगम खान यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सतीश आनंदा वाघ रा. अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी तसेच फॅक्टरी परिसरातील इतर तिघेजण अशा एकूण चारजणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नाईक हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.