या तालुक्यात विषारी दारूमुळे चार दिवसात दोनजणांचा बळी

पोलिसांचे दुर्लक्ष || मटका तेजीत
File Photo
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) अवैध धंदे आणि मटका (Matka), जुगार (Gambling) व हातभट्टीच्या गावठी दारूमुळे (Hand Furnace Village Alcohol) कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथे प्रसादनगर परिसरात गावठी हातभट्टीच्या दारूमुळे चार दिवसात दोनजणांचा बळी (Death) गेल्याने तेथील महिला आणि नागरिकांनी राहुरी पोलिसांच्या (Rahuri Police) निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला आहे. आता गावठी दारूमुळे तिसरा बळी गेला तर त्या मृतदेहावर राहुरी पोलीस ठाण्याच्या (Rahuri Police Station) आवारातच अंत्यसंस्कार (Funeral) करण्याचा इशारा (Hint) संतप्त महिलांनी दिला आहे.

File Photo
जायकवाडीतून 30435 क्युसेकने विसर्ग

दरम्यान, प्रसादनगरला मटका (Matka), जुगार (Gambling) आणि गावठी हातभट्टीच्या (Hand Furnace Village Alcohol) धंद्याला उधाण आले आहे. तर कराळेवाडीतही जुगार व मटका धंदा खुलेआम सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला आहे. राहुरी फॅक्टरीवरील (Rahuri Factory) मटका (Matka) आणि जुगार (Gambling) बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

File Photo
संगमनेर नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन

मागील महिन्यात संतप्त महिलांनी प्रसादनगर भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूअड्ड्याबाबत राहुरी पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे राहुरी पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले. त्यानंत्तर संतप्त महिलांनी तेथे आलेल्या झिरो पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना समजताच काही अंतरावर बसलेले राहुरीच्या दोन पोलिसांनी तेथून पलायन केले. त्यानंत्तर श्रीरामपूरच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने प्रसादनगर भागात आपल्या पथकासह धाड टाकण्याची नौटंकी केली. मात्र, त्यानंत्तर प्रसादनगरला पुन्हा हातभट्टीची दारू अन् मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू आहेत. तर कराळेवाडीसह राहुरी फॅक्टरीसह मटका खुलेआम सुरू झाला आहे. त्याकडेही राहुरी पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे संताप व्यक्त केला आहे.

सध्या प्रसादनगर भागात गावठी हातभट्टीची दारू पाडण्यासाठी अत्यंत घातक अशा जनावरांसाठी लागणार्‍या विषारी गोळ्यांचा वापर करण्यात येत असून या गोळ्या मानवी आरोग्याला प्राणघातक ठरल्या आहेत. या गोळ्यांपासून बनविलेली दारू पिऊन प्रसादनगर भागातील दोन जणांचा बळी गेल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. तर आता तिसरा बळी गेला तर त्या मृतदेहावर राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारातच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे. चार दिवसात गावठी हातभट्टीची दारू पिऊन दोन जणांचा बळी जाऊनही राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवल्याने याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी चौकशी करून पोलीस निरीक्षकांवरच कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

दरम्यान, राहुरी फॅक्टरीवर खुलेआम सुरू असलेला मटका तातडीने बंद करावा, छुप्या मार्गाने होत असलेली गुटखा विक्री बंद करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. राहुरी शहर व देवळाली प्रवरातही मोठ्या प्रमाणात मटका तेजीत असल्याने या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यास पोलीस अपयशी ठरले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

प्रसादनगरला गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे खुलेआम हातभट्टीच्या दारूची सर्रास विक्री होत आहे. आता विषारी गोळ्या टाकून दारू तयार होत असल्याने या विषारी दारूमुळे राहुरी तालुक्यात पांगरमलच्या दारूकांडाची पुनरावृत्ती होईल की काय? अशी धास्ती नागरिकांनी घेतली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com