राहुरी फॅक्टरी येथे त्या तरुणीचा खून केल्याची गायकवाडने दिली कबुली!

राहुरी फॅक्टरी येथे त्या तरुणीचा खून केल्याची गायकवाडने दिली कबुली!

राहुरी फॅक्टरी |वार्ताहर| Rahuri factory

शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे ( वय- 24 ) यांंच्या खून प्रकरणातील मास्टरमाइंड ज्ञानेश्वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड ( वय - 22 , रा . भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर ) याला मंगळवारी ( दि .1 ) नाशिक येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. चौकशीत त्याचे इतर कारनामे उघड होत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ‘लिव्ह इन’मध्ये राहणार्‍या प्रियसीच्या डोक्यात दगड घालून राहुरी फॅक्टरी येथे 14 मार्च रोजी तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे.

दरम्यान राहुरी (जि. अहमदनगर) पोलीस ठाण्यात अनोळखी महिलेच्या खुनाची नोंद झाली होती,राहुरी फॅक्टरी येथे 14 मार्च रोजी डोक्यात दगड घालून तरुणीचा खून करण्यात आला होता त्या तरुणीच्या हातावर एस पी असे इंग्रजी अक्षरे गोंधलेले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त होत असल्याने या घटनेचा तपास पुढे सरकला नाही व त्या तरुणीवर नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सराफा व्यापारी खुनापाठोपाठ या महिलेच्या खुनाचाही उलगडा करण्यात बीडच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. विशाल कुलथे हे सराफा व्यापारी दि.20 मे रोजी अचानक बेपत्ता झाले होते. शिरुर पोलीस ठाण्यात नोंंद झाल्यानंतर तपासाचे धागेदोरे ज्ञानेश्वर गायकवाड पर्यंत असल्याचे निष्पन्न झाले होते , दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्ञानेश्वरने विशाल यांचा विश्वास संपादन केला.

दि. 20 रोजी दागिन्यांचे पैसे देण्याचा बनाव करत सलूूनच्या दुकानात नेऊन कात्रीने गळ्यावर वार करून खून करत दागिन्यांंसह पोबारा केला . दोन मित्रांच्या मदतीने विशाल यांचा मृतदेह दुचाकीवरून भातकुडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर येथे नेऊन शेतात पुरून टाकला होता. या प्रकरणात ज्ञानेश्वर गायकवाडचा पिता शिवाजी गायकवाड तसेच धीरज मांंडकर ( रा. आनंदनगर, पाथर्डी) व केतन लोमटे (रा. भातकुडगाव ) यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

फरार ज्ञानेश्वर गायकवाडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत व त्यांच्या सहकार्‍यांनी मंगळवारी पहाटे मोठ्या शिताफीने नाशिकमध्ये मुसक्या आवळल्या . त्याला घेऊन पथक बीडमध्ये पोहोचले. ज्ञानेश्वरला शिरुर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली . दरम्यान गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी केली . यावेळी त्याने नाशिक (सातपूर)येथील तरुण प्रेयसीच्या खुनाची कबुली दिली आहे. या महिलेच्या खुनाची माहिती राहुरी पोलिसांना कळविण्यात आली आहे.गायकवाड यास राहुरी पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर या घटनेचा उलगडा होईल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com