राहुरी फॅक्टरीवरील विवाहितेचा छळप्रकरणी नेवाशातील सहाजणांवर गुन्हा

राहुरी फॅक्टरीवरील विवाहितेचा छळप्रकरणी नेवाशातील सहाजणांवर गुन्हा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारिरीक व मानसिक छळ करून तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. पूजा विलास डूकरे, रा. वरखेड, ता. नेवासा, हल्ली राहणार प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी या तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, पूजा विलास डूकरे ही तरुणी नेवासा येथे तिच्या सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी तिचा वेळोवेळी शारिरीक व मानसिक छळ केला. वेळप्रसंगी तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कृषी सेवा दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण. असे सांगून तिला घराबाहेर हाकलून दिले.

पूजा विलास डूकरे हिच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी विलास विठ्ठल डूकरे, विठ्ठल शंकर डूकरे, विमल विठ्ठल डूकरे, किसन शंकर डूकरे, कलाबाई किसन डूकरे सर्व राहणार वरखेड, ता. नेवासा तसेच मंगल गोरख गायकवाड राहणार लोणी, ता. राहाता या सहाजणांवर गुन्हा रजि. नं. 765/2022 भादंवि. कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे शारिरीक व मानसिक छळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव गर्जे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com