उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

देवळाली प्रवरा | वार्ताहार

येथील येवले वस्तीवर एका ऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची दखल घेत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवळाली प्रवरा येथील येवले वस्तीवर जनावरांच्या चा-चाऱ्यासाठी ऊसाची तोड सुरु आहे. दुपारी दीडच्या सुमारास मजूर ऊस तोड करीत असतांना त्यांना साधारणत एक-दिड महिना वयाचे तिन बछडे ऊसाच्या सरीत आढळून आले. ही वार्ता परिसरात समजताच मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली.

या बाबत ऊस मालकाने वनविभागाला कळविले असता वनविभागाचे कर्मचारी मोरे हे घटनास्थळी आले व त्यांनी परिस्थितीची पाहाणी करुन वाघिण इथेच कुठेतरी जवळपास असल्याचे सांगून सर्वांना त्या ठिकाणाहून दूसरी जाण्यास सांगितले. माणसं बाजूला होताच काही वेळाने वाघिण त्या ठिकाणी आली व बछड्यांना घेऊन शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात गेली. या बाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली. परंतू बछडे लहान असल्याने वाघिणीची व बछड्यांची ताटातूट झाल्यास ती आणखी हिंस्र होईल आणि त्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे सांगितल्या शेतकऱ्यांमध्ये आणखी घबराट पसरली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com