अल्पवयीन मुलीची छेड काढून वडिलांच्या डोक्यात दगड घालण्याची धमकी

अल्पवयीन मुलीची छेड काढून वडिलांच्या डोक्यात दगड घालण्याची धमकी

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीची छेडछाड करून कोणाला काही सांगितले तर तुझ्या वडिलांच्या डोक्यात दगड घालू अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी दोघा जणांवर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही अल्पवयीन मुलगी सायकलवरून क्लासला जात होती. त्यावेळी आरोपी एका मोटरसायकलवर तिच्या समोरून आले आणि त्या अल्पवयीन मुलीला हाक मारून हावभाव करत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने ती मुलगी घाबरली आणि पुन्हा सायकलवर बसून रस्त्याने जाऊ लागली. तेव्हा आरोपींनी तिचा पाठलाग करून तू झालेल्या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या वडिलांच्या डोक्यात दगड घालू, अशी धमकी दिली.

घटनेनंतर अल्पवयीन मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अशोक वरघुडे व गणेश विठ्ठल वरघुडे दोघे राहणार वरघुडे वस्ती, कणगर, ता. राहुरी. या दोघांवर भादंवि कलम 354 (अ), 354 (ड), 506 बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com