विवाहितेच्या छळ; पती व सासूविरूद्ध गुन्हा

विवाहितेच्या छळ; पती व सासूविरूद्ध गुन्हा

राहुरी (प्रतिनिधी)-

मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या पतीने दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यासाठी विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ केल्याची घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे.

जयश्री संदीप रन्नवरे (वय २५) वर्षे, रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फेब्रुवारी २०१५ पासून ते सप्टेंबर २०१८ रोजी दरम्यान जयश्री रन्नवरे ही तिच्या सासरी नांदत असताना यातील आरोपी हे तिला नेहमी म्हणत, तू आम्हाला आवडत नाही. तू आई वडील यांच्याकडून जागा घेण्यासाठी तसेच दुबईला जाण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये. या कारणावरुन आरोपींनी जयश्री रन्नवरे हिला नेहमी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच उपाशीपोटी ठेवून घराबाहेर हाकलून दिले. तिचा शारिरीक व मानसिक छळ करुन तू जर पैसे घेऊन आली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. असा दम दिला आहे.

या सर्व प्रकरणाला कंटाळून जयश्री रन्नव हिने राहुरी पोलिसात धाव घेतली. घडलेला प्रकार पोलिसांसमक्ष कथन केला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती संदीप गोरख रन्नवरे, सासू शोभा गोरख रन्नवरे दोघे रा. कराळेवाडी रा हुरी फॅक्टरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com