राहुरीत 150 किलो गोमांसाची विक्री करणारा समीर पठाण गजाआड

राहुरीत 150 किलो गोमांसाची विक्री करणारा समीर पठाण गजाआड

नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

महाराष्ट्र राज्यात गोमांस विक्री करण्यास बंदी असताना देखील समीर पठाण हा राहुरी शहरहद्दीत दि. 21 मे रोजी गोमांस विक्री करताना आढळून आला आहे. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने त्याच्यावर कारवाई करून 150 किलो गोमांस व इतर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

महाराष्ट्र राज्यात गोवंशी जनावरांचे गोमांस कब्जात बाळगणे व विक्री करण्याची बंदी असतानाही राहुरी तालुक्यात गोमांस विक्री सुरू असल्याचे दिसून आले. काल दि. 21 मे रोजी सकाळी साडेदहा वाजे दरम्यान राहुरी शहरहद्दीतील नगर-मनमाड राज्य महामार्गावर मल्हारवाडी चौक परिसरात आरोपी समीर चाँद पठाण (वय 45 वर्षे, रा. खाटीक गल्ली, राहुरी) हा इसम गोमांस विक्री करताना आढळून आला. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

यावेळी त्याच्याकडून अंदाजे 22 हजार 500 रुपये किंमतीचे 150 किलो गोमांस, 500 रुपये किंमतीचा एक सुरा व एक लाकडी ठोकळा तसेच 500 रुपये किंमतीचा एक छोटा लोखंडी वजन काटा असा एकूण 23 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच समीर चाँद पठाण याला ताब्यात घेऊन गजाआड केले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील हवालदार शिवाजी ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत गुन्हा रजि. नं. व कलम - ॥ 389/21 भादंवि. कलम -369, 34 महाराष्ट्र पशूसंरक्षण (सुधारणा) अधिनियम सन 1995 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे समीर चाँद पठाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक मनोजसिंह राजपुत हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com