राहुरीत ट्रॅक्टरच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व धमकी

राहुरीत ट्रॅक्टरच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व धमकी

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

दगडाने भरलेला ट्रॅक्टर खाली करण्याच्या कारणावरून सुनीता चव्हाण या महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना दि. 27 ऑगस्ट रोजी राहुरी शहरहद्दीत घडली आहे.

सुनीता समीर चव्हाण, रा. राहुरी या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले, दि. 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान आरोपी ट्रॅक्टरमध्ये दगडे घेऊन आले आणि सुनीता चव्हाण यांच्या घरासमोर ट्रॅक्टर खाली करू लागले. तेव्हा सुनीता चव्हाण या त्यांना म्हणाल्या, तुम्ही आमच्या घरासमोर ट्रॅक्टर खाली करू नका. या जागेचा दावा नं. 7/2022 हा तहसीलदार यांच्यासमोर चालू आहे. त्याचा निकाल लागला नाही, असे म्हणाल्याचा आरोपींना राग आल्याने ते सुनीता चव्हाण यांना म्हणाले, आम्हाला येथे घर बांधायचे आहे. तू आम्हाला विचारणार कोण? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.

सुनीता समीर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरिफ सत्तार मुसाणी, आमीन सत्तार मुसाणी, जुबेर अन्वर मुसाणी सर्व रा. राहुरी बुद्रुक, ता. राहुरी या तिघांवर गुन्हा रजि. नं. 715/2022 भादंवि. कलम 504, 506 प्रमाणे शिवीगाळ दमदाटी करून मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक शहामद शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com